शेंगदाण्याची ओली चटणी

ही चटणी आपण  भाकरीबरोबर खाऊ शकतो, पोळीबरोबर सट्टा आपण खाऊ शकतो,

साहित्य.:-

  1. हिरव्या मिरच्या 7 ते 8,
  2. यशवंत पाकळ्या चार-पाच,
  3. शेंगदाणे एक छोटी वाटी,
  4. मीठ,
  5. पाणी,
  6. कोथिंबीर एक छोटी वाटी.

कृती.:-

  • गॅसवर तवा गरम करून त्यावर प्रथम मिरच्या भाजून घ्यावे नंतर शेंगदाणे पण भाजून घ्यावेत.  कोथिंबीरीच्या कोवळ्या दांड्या घ्याव्यात. मिक्सरमध्ये लसणाच्या पाकळ्या शेंगदाणे मिरच्या चवीनुसार मीठ टाकून चटणी वाटून घ्यावी, 
  • नंतर कोथिंबीर टाकून परत एकदा  चटणी वाटून घ्यावी, एका छोट्या भांड्यात मिक्सर मधून चटणी काढून घ्यावी यामध्ये आपल्याला चटणी किती पातळ हवे त्याप्रमाणे पाणी टाकावे पण शक्यतो पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे चटणी, 
  • थोडी घट्टसर ठेवावी. ही चटणी खाताना त्यावर शेंगदाणा तेल वरून घ्यावे खूप चविष्ट लागते,. 

चटणी कळण्याच्या भाकरीबरोबर किंवा मेथीचा भाकरीवर खायला खूप छान लागते,
नक्की करून बघा शेंगदाण्याची हिरवेगार ओली चटणी. ही चटणी फ्रिज मध्ये दोन-तीन दिवस राहू शकते,


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट